महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Babar Azam Support Kohli : बाबर आझमने केले कोहलीचे समर्थन; म्हणाला....! - क्रिकेटच्या बातम्या

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रन मशीन म्हटल्या जाणाऱ्या विराट कोहलीची बॅट पुन्हा तळपली नाही. 16 धावांच्या खेळीनंतर कोहली बाद झाला. त्यानंतर त्याच्यावर टीका होत असताना बाबर आझमने ( Babar Azam Support to Virat Kohli ) त्याला समर्थन दिले आहे.

Babar Virat
बाबर विराट

By

Published : Jul 15, 2022, 3:48 PM IST

नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आऊट ऑफ फॉर्ममध्ये ( Former captain Virat Kohli ) आहे. इंग्लंड दौऱ्यात तो सपशेल अपयशी ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात कोहली मांडीच्या दुखापतीमुळे बाहेर पडला होता आणि दुसऱ्या सामन्यात त्याला केवळ 16 धावा करता आल्या होत्या. कोहलीच्या या वाईट टप्प्यात अनेक दिग्गजांनी त्याला साथ दिली, तर काहींनी त्याच्यावर टीका करत सल्लेही दिले.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम कोहलीच्या समर्थनात समोर आला ( Azam came in support of Kohli ) आहे. त्याने कोहलीसोबतचे आपले घट्ट नाते सांगणारी पोस्ट शेअर केली आहे. बाबरने कोहलीला मजबूत राहण्यास सांगितले. हा वाईट टप्पा लवकरच निघून जाईल ( This bad phase will pass soon ), असे पाकिस्तानी कर्णधाराने पोस्टच्या माध्यमातून कोहलीला समजावून सांगितले. त्याने याबाबतचे ट्विट केले आहे.

दुसऱ्या वनडेत इंग्लंडने भारतावर 100 धावांनी मात केली. रन मशीन म्हणवल्या जाणाऱ्या विराट कोहलीची ( Virat Kohli out of form ) बॅट पुन्हा धावा करु शकली नाही. विराट कोहली 16 धावांच्या खेळीनंतर बाद झाला. विराटशिवाय सूर्यकुमार यादवने 27 धावा केल्या, तर हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजाने 29-29 धावा केल्या. यानंतर लवकरच भारतीय सेना अवघ्या 146 धावांवर आटोपली. त्यामुळे टीम इंडियाला 100 धावांनी दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.

हेही वाचा -Cricket and Bollywood : 'या' क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींना बनवले जीवन सोबती, तर काही करतायेत डेट

ABOUT THE AUTHOR

...view details