मेलबर्न:श्रीलंकेतील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ( Cricket Australia ) गुरुवारी एक निवेदन जारी करून सांगितले की, हा दौरा होणार आहे. निवेदनात सर्व फॉरमॅटच्या सहा आठवड्यांच्या प्रदीर्घ दौर्याची योजना सुचवण्यात आली आहे. ज्यामध्ये राजधानी कोलंबो, कँडी, गाले आणि हंबनटोटा येथे सामने होणार आहेत. एका प्रवक्त्याने सांगितले की, "आम्ही श्रीलंकेतील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत आणि डीएफएटी श्रीलंका क्रिकेटच्या सतत संपर्कात आहोत."
तो पुढे म्हणाला, आमच्या खेळाडूंना आणि सपोर्ट स्टाफला कळवण्यात आले आहे. संघाच्या प्रस्थानासाठी तीन आठवडे शिल्लक असून या टप्प्यावर वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) ने जोर देऊन सांगितले की, राजकीय अशांतता असूनही पुढील महिन्यात श्रीलंकेचा दौरा करण्यासाठी ते वचनबद्ध ( Australia committed to touring Sri Lanka ) आहे, ज्यामुळे ऑस्ट्रेलियन सरकारने नागरिकांना बेटावर प्रवास करण्याच्या त्यांच्या आवश्यकतेवर पुनर्विचार करण्यास सल्ला दिला आहे.
श्रीलंकेच्या विनाशकारी आर्थिक संकटानंतर झालेल्या हिंसाचारानंतर ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र व्यवहार आणि व्यापार विभागाने ( DFAT ) या आठवड्यात आपला प्रवास सल्ला अपडेट केला आहे. इंधन, अन्न आणि औषधांचा तुटवडा असताना, गेल्या महिन्याभरातील बहुतेक शांततापूर्ण निषेध या आठवड्यात हिंसक झाले, ज्यामुळे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना राजीनामा देण्यास प्रवृत्त केले. यासोबतच आंदोलकांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ऑस्ट्रेलियाने मार्च-एप्रिलमध्ये तीन कसोटी तसेच चार मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी पाकिस्तानचा यशस्वी दौरा केला होता.