मेलबर्न - ऑस्ट्रेलियाचा संघ लवकरच वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या संघाची घोषणा केली आहे. अॅरोन फिंचकडे संघाचे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाने आगामी टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने संघ निवडला आहे. यात त्यांनी स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, मार्कस स्टायनिस, अॅलेक्स कॅरी आणि मिचेल स्वेपसन या सारख्या खेळाडूंना संघात स्थान दिलं आहे. दुसरीकडे मार्नस लाबुसेन आणि कॅमेरुन ग्रीन यांना संघात स्थान मिळालेले नाही.
ऑस्ट्रेलिया वेस्ट इंडीज दौऱ्यात ५ टी-२० आणि ३ एकदिवसीय सामन्याची मालिका खेळणार आहे. विशेष म्हणजे, तब्बल ५ वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्याला ९ जुलैपासून सुरूवात होणार आहे.