नवी दिल्ली : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा चौथा कसोटी सामना अहमदाबाद, गुजरातमध्ये खेळवला जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे तिकीट मिळवण्यासाठी भारताला शेवटचा कसोटी सामना जिंकावा लागेल. भारताने हा सामना गमावला तर मालिकाही हाताबाहेर जाईल. आतापर्यंत चार कसोटी मालिकेतील तीन सामने खेळले गेले आहेत. तीनपैकी भारताने दोन आणि ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला आहे. तिसरा कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. भारताला अंतिम कसोटीत विजय मिळवणे आवश्यक आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी आणि शेवटची कसोटी गुरुवारपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाली आहे.
रवींद्र जडेजा सामनावीर :चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचे खेळाडू उत्साहात दिसले. कर्णधार स्टीव्ह स्मिथसह ऑस्ट्रेलियाचे खेळाडू होळीच्या रंगात रंगताना दिसले. मार्नस लॅबुशेनने होळी साजरी करताना त्याच्या टीममेट्सचे फोटो शेअर केले. स्टीव्ह स्मिथ, पीटर हँड्सकॉम्ब, मॅट कुहनेमन आणि ॲलेक्स कॅरी उत्सवाचा आनंद लुटताना दिसले. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी नागपुरात खेळली गेली. या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजाला सामनावीर म्हणून निवडण्यात आले.