महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Shane Warne Passes Away : ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्शच्या निधनाचे सकाळी केले होते ट्विट; संध्याकाळी शेन वॉर्नचे निधन - माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न

Australia bowler Shane Warne dies
ऑस्ट्रेलियन गोलंदाज शेन वॉर्न यांचे निधन

By

Published : Mar 4, 2022, 7:44 PM IST

Updated : Mar 4, 2022, 10:47 PM IST

20:01 March 04

19:57 March 04

विश्वासच बसत नाही - विरेंद्र सेहवाग

विश्वासच बसत नाही. महान फिरकीपटूंपैकी एक, फिरकीला कूल बनवणारा, सुपरस्टार शेन वॉर्न राहिला नाही. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्यांचे कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना. अश्या भावना विरेंद्र सेहवाग यांचे व्यक्त केल्या आहेत.

19:43 March 04

माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर शेन वॉर्न यांचे निधन

नवी दिल्ली -ऑस्ट्रेलियाचे (Australia) माजी क्रिकेटर शेन वॉर्न (Shane Warne) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने थायलंड (Thailand) येथे त्यांचे निधन झाले आहे. ऑस्ट्रेलियासाठी हा दुसरा धक्का आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रॉड मार्श यांचे आज सकाळी निधन झाले त्यानंतर आता शेन वॉर्न यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे.

शेन वॉर्नने काही दिवसांपूर्वीच रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. शेन वॉर्नने युक्रेनच्या बाजूने ट्विट करुन रशियाची कारवाई पूर्णपणे चुकीची असल्याचे सांगितले होते. यावेळी वॉर्नने युक्रेनचे समर्थन केले होते.

शेन वॉर्नची कारकीर्द

अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसेच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्नची ख्याती होती. ऑस्ट्रेलियाकडून (Australia Cricket) अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहिती आहे. वॉर्नने 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 खेळाढूंना माघारी धाडले आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट घेतले होते.

शेन वॉर्नची आयपीएलमधील कामगिरी-

शेन वॉर्नने आपल्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सला आयपीएलचे पहिलं विजेतेपद मिळवून दिले होते. वॉर्नने आयपीएलमध्ये 55 मॅचमध्ये 57 विकेट्स घेतल्या होत्या.

1992 मध्ये भारताविरुद्ध पदार्पण -

शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जानेवारी 2007 मध्ये त्याने सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

विरेंद्र सहवागकडून श्रद्धांजली -

भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सहवागने याबाबत ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. त्याने लिहिले आहे की, विश्वासच बसत नाही. महान फिरकीपटूंपैकी एक, फिरकीला कूल बनवणारा, सुपरस्टार शेन वॉर्न आपल्यात नाही आता. जीवन खूप नाजूक आहे, परंतु हे समजणे फार कठीण आहे. त्याचे कुटुंब, मित्र आणि जगभरातील चाहत्यांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.

Last Updated : Mar 4, 2022, 10:47 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details