महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Shane Warne Memorial: जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांनी एमसीजी येथे महान स्पिनर शेन वार्नला वाहिली श्रद्धांजली - शेन वॉर्नला शेवटचा निरोप

ऑस्ट्रेलियाने बुधवारी आपल्या दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नला ( Veteran cricketer Shane Warne ) त्याच्या मूळ गावी मेलबर्नमध्ये त्याच्या आठवणींना उजाळा दिला, ज्यासाठी मेलबर्न क्रिकेट मैदानावर त्याचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 'जिनियस' म्हणून प्रसिद्ध असलेल्या शेन वॉर्नच्या स्मरणार्थ ठेवण्यात आलेल्या या सभेला सुमारे 10,000 लोक उपस्थित होते.

Shane Warne
Shane Warne

By

Published : Mar 30, 2022, 10:43 PM IST

मेलबर्न:ऑस्ट्रेलियन संघाचे माजी सहकारी, जागतिक क्रिकेटचे महान खेळाडू, प्रसिद्ध संगीतकार आणि हजारो लोकांनी बुधवारी मेलबर्न क्रिकेट मैदानावरील प्रसिद्ध शेन वॉर्न मेमोरियलमध्ये ( Shane Warne Memorial ) त्याला श्रद्धांजली वाहिली. आतापर्यंतच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक मानला जाणारा वॉर्न, या महिन्याच्या सुरुवातीला वयाच्या 52 व्या वर्षी कोह सामुई, थायलंड येथे सुट्टीवर असताना संशयास्पद हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावला.

दिवंगत फिरकीपटूच्या सेवेदरम्यान, त्याचे वडील, भाऊ आणि तीन मुलांनी एमसीजीमध्ये उपस्थित हजारो लोकांसमोर भावपूर्ण भाषणे दिली. जेथे वॉर्नने उत्कृष्ट विक्रम केले होते, ज्यामध्ये त्याने 2006 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये 700 वी विकेट घेतलेल्याचा समावेश होता. वॉर्नचे वडील कीथ ( Warne's father Keith ) म्हणाले, शेन म्हणाला होता की, मी स्मोकिंग केले, मी मद्यपान केले आणि थोडे क्रिकेट खेळले. मित्रा, तुझी आई आणि मी तुझ्याशिवाय जीवनाची कल्पना करू शकत नाही. तू खूप लवकर गेला आहेस आणि आमची मनं तुटली आहेत.

या दिग्गज क्रिकेटपटूने 2007 मध्ये 708 कसोटी बळींसह आपली 15 वर्षांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपवली आणि डॉन ब्रॅडमन, गारफिल्ड सोबर्स, जॅक हॉब्स आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यासमवेत विस्डेनच्या 20 व्या शतकातील पाच क्रिकेटपटूंपैकी एक म्हणून त्याचे नाव घेतले गेले.

वॉर्नची मुलगी समर ( Warne's daughter Summer ) म्हणाली, तुम्हाला स्वर्गात जाऊन 26 दिवस झाले आहेत आणि मला संपूर्ण जगात तुमची सर्वात जास्त आठवण येते. मी तुम्हाला आणखी एकदा मिठी मारण्यासाठी काहीही करेन. मला सांगा की तुम्हाला माझ्याबद्दल किती अभिमान आहे आणि तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता. ती पुढे म्हणाली, मला माहित आहे की, तुम्ही नेहमी माझ्याकडे पाहाल आणि संपूर्ण वेळ माझी काळजी घ्यालं.

इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेन ( Former England captain Nasser Hussein ), ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मार्क टेलर, अॅलन बॉर्डर, वेस्ट इंडिजचा माजी फलंदाज ब्रायन लारा आणि ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज मर्व्ह ह्युजेस ( Former bowler Merv Hughes ) यांनी फिरकी गोलंदाजाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मंचावर होते. तसेच वॉर्नचे इतर ऑस्ट्रेलियन सहकारी, गोलंदाज ग्लेन मॅकग्रा, यष्टिरक्षक अॅडम गिलख्रिस्ट, माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांच्यासह ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन देखील उपस्थित होते.

हेही वाचा -IPL 2022 Updates: मिचेल मार्शच्या आयपीएल सहभागाबद्दल महत्वाची माहिती; 'या' तारखेला दिल्ली कॅपिटल्स सोबत जोडला जाणार

ABOUT THE AUTHOR

...view details