हैदराबाद: ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट संघ ( Australian Cricket Team ) श्रीलंका संघाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात कसोटी, वनडे आणि टी-20 मालिका खेळली जाणार आहे. आता या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने आपल्या तिन्ही संघांची घोषणा केली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या दौऱ्यासाठी 34 खेळाडूंची निवड केली असून त्यात 16 सदस्यीय 'अ' संघही आहे. अॅरॉन फिंच ( Aaron Finch ) वनडे आणि टी-20 चे कर्णधार असेल, तर पॅट कमिन्स ( Pat Cummins ) कसोटी संघाचे नेतृत्व करेल. याशिवाय ऑस्ट्रेलिया अ संघाचीही घोषणा करण्यात आली असून त्यात अनेक खेळाडूंना स्थान मिळाले आहे.
ऑस्ट्रेलियाचा श्रीलंका दौरा हा 7 जूनपासून सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये पहिल्यांदा तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. त्यानंतर पाच एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाईल. एकदिवसीय मालिका 14 जूनपासून तर कसोटी मालिका 29 जूनपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर पूर्णवेळ प्रशिक्षक म्हणून अँड्र्यू मॅकडोनाल्डचा ( Coach Andrew MacDonald ) हा पहिलाच दौरा असणार.
श्रीलंका दौऱ्यासाठी ऑस्ट्रलियाचे तीन संघ -