दुबईआशिया चषक 2022 Asia Cup 2022या स्पर्धेतील पहिला सामना शनिवारी अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका Afghanistan vs Sri Lanka संघात पार पडला. या सामन्यात अफगाणिस्तान संघाने 8 विकेट्सने श्रीलंका संघाला पराभूत Afghanistan beat Sri Lanka by 8 wickets केले. श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना, 19.4 षटकांत सर्वबाद 105 धावा केल्या होत्या. त्यानंतर अफगाणिस्तानने 10.1 षटकात दोन गडी गमावून 106 धावांचे लक्ष्य पार केले. ज्यामध्ये रहमानउल्ला गुरबाजने 40 आणि हजरतुल्ला झाझाईने नाबाद 37 धावा केल्या.
श्रीलंकेचा डाव केवळ 105 धावांत गुंडाळला
अफगाणिस्तानने या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी पहिल्याच षटकापासून आपले वर्चस्व दाखवायला सुरुवात केली. पहिल्याच ओव्हरमध्ये फजल फारुक याने दोन विकेट्स घेत श्रीलंकन संघावर दबाव बनवला. त्यानंतर मोहम्मद नबी Captain Mohammad Nabi आणि मुजीब अल रेहमान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत श्रीलंकेचा डाव केवळ 105 धावांत गुंडाळला.
10.1 षटकांत अफगाणिस्तानचा विजय