मुंबई - जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि इंग्लंड दौऱ्यासाठी स्टँड बॉय खेळाडू म्हणून भारतीय संघात निवड झालेल्या अर्जन नागवासला याने एक मोठी प्रतिक्रिया दिली आहे. सुरूवातीच्या काळात तो जहीर खानच्या गोलंदाजीची कॉपी करत होता. जहीर खानचे व्हिडिओ तो गोलंदाजीचे बेसिक शिकला असल्याचे त्याने सांगितलं आहे.
अर्जन नागवासला आयपीएल २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सचा नेट गोलंदाज होता. फ्रेंचायझीने जहीर खान खान आणि नागसवाला यांच्या एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत दोघेही एक सारख्या अॅक्शनने गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत.
एका माध्यमाशी बोलताना अर्जन नागवासला म्हणाला की, मुंबईने शेअर केलेला फोटो पाहून मी दंग झालो. कारण यात मी माझा आयडल जहीर खान सारखं गोलंदाजी करताना दिसत आहे.
पुढे तो म्हणाला, मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्राम पेजवरून हा फोटो शेअर केलेला मी पहिल्यादा पाहिलो. तो क्षण सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी जहीर खानचे व्हिडिओ पाहून बेसिक गोलंदाजी शिकलो. तुम्ही हे म्हणू शकता की, मी जहीर खानची नक्कल करण्याचा प्रयत्न करतो. मी जहीर सारखं रनअप आणि जम्प करत होतो.
दरम्यान, नागवासला २०१८ मध्ये वानखेडे स्टेडियममध्ये झालेल्या मुंबईविरुद्धच्या डेब्यू सामन्यात एका डावामध्ये ५ गडी बाद केल्यानंतर चर्चेत आला होता. त्याने २३.३ षटकात ७३ धावा देत मुंबईचे ५ गडी बाद केले होते. देशाअंतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने, त्याला बक्षिसच्या स्वरुपात भारतीय संघात स्टँड बॉय खेळाडू म्हणून स्थान मिळालं आहे.
हेही वाचा -'नॅशनल क्रश' रश्मिकाला आवडतो 'हा' क्रिकेटपटू
हेही वाचा -वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा