मुंबई - भारतीय महिला क्रिकेटर अंशुला राव उत्तेजक चाचणीत दोषी आढळली आहे. यामुळे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने (नाडा) अंशुलावर चार वर्षांसाठी बंदी घातली आहे. दरम्यान, अंशुला उत्तेजक चाचणीत अपयशी ठरणारी भारताची पहिला महिला क्रिकेटर ठरली आहे.
अंशुला राव ही मध्य प्रदेशकडून क्रिकेट खेळते. ती एक अष्टपैलू खेळाडू आहे. तिची दोनदा चाचणी करण्यात आली. यात दोन्ही वेळा ती चाचणीत दोषी आढळली. दुसऱ्यादा करण्यात आलेल्या चाचणीचा खर्च देखील अंशुला राव याला करावा लागणार आहे. तो खर्च २ लाख रुपये इतका आहे.
अंशुला हिने तिचा परफॉर्मंन्स वाढवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक उत्तेजक द्रव पदार्थाचे सेवन केले. अंशुला २०१९-२९० या सत्रात २३ वर्षाखालील स्पर्धेत अखेरची खेळली होती. मागील वर्षी मार्चमध्ये उत्तेजक पदार्थ सेवन केल्याने तिचे निलंबन करण्यात आले होते.