हैदराबाद:आयपीएल ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून ओळखली जाते. या स्पर्धेत जगभरातील क्रिकेट भाग घेतात आणि आपले नशिब आजमवतात. यामध्ये काही यशस्वी होतात, तर काही अपयशी ठरतात. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सने ( Former cricketer Andrew Symonds ) मायकल क्लार्कसोबतच्या ( Michael Clark ) कट्टू संबंधांवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएलमध्ये मिळालेल्या पैशांमुळे दोन्ही खेळाडूंच्या नात्यात दुरावा कसा निर्माण झाला हे त्याने सांगितले.
अँड्र्यू सायमंड्स ( Andrew Symonds ) आणि मायकेल क्लार्क यांनी खूप काळ एकत्र क्रिकेट खेळले आहे. दोघांचेही एकमेकांशी खूप चांगले नाते होते. तथापि, सायमंड्सच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवसांत, त्याचे क्लार्कशी नाते बिघडले. सायमंड्सच्या म्हणण्यानुसार, त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी भरपूर पैसे मिळाले आणि त्यामुळेच मायकेल क्लार्क त्याच्यावर जळत होता. आयपीएलचा पहिला हंगाम 2008 साली खेळला गेला होता. या हंगामाच्या लिलावात सायमंड्स हा दुसरा सर्वाधिक महागडा खेळाडू ठरला होता. डेक्कन चार्जर्स हैदराबादने ( Deccan Chargers Hyderabad ) त्याच्यासाठी जोरदार बोली लावली होती. यामुळे क्लार्क त्याच्यावर जळत होता, असे सायमंड्सचे मत आहे.