महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Analysis Virat vs Jos : विराट कोहली आणि जोस बटलरच्या एका आयपीएल हंगामातील कामगिरीची तुलना

आयपीएल 2022 मध्ये जोस बटलर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून उदयास आला. काही क्रिकेटच्या दिग्गजांनी असा दावा केला की, त्यांनी एका हंगामात कोणालाही इतकी चांगली कामगिरी करताना पाहिले नाही अपवाद विराट कोहलीचा ( Virat Kohli ). 2016 मध्ये विराट कोहलीने हा विक्रम केला होता. परंतु बटलरला विराटच्या सर्वाधिक धावाच विक्रम मोडता आला नाही.

Virat vs Jos
Virat vs Jos

By

Published : May 30, 2022, 8:59 PM IST

हैदराबाद: ऑरेंज कॅप विजेता जोस बटलरने ( Orange Cap winner Jose Butler ) त्याच्या राजस्थान रॉयल्स (RR) फ्रँचायझीसाठी यंदाच्या हंगामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने या हंगामात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याचा यंदाचा हंगाम एक स्वप्नवत होता. त्याने या हंगामात 17 सामन्यात 824 धावा केल्या आहेत. ज्यात त्याच्या चार शतकांचा समावेश होता, त्याच जोरावर राजस्थानने आयपीएलच्या फायनलपर्यंतचा प्रवास निश्चित केला.

तथापि, गुजरात टायटन्सने स्पर्धेपूर्वीचे सर्व अंदाज झुगारून, अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सवर सात विकेट्सने विजय मिळवून स्वप्नत वाटणाऱ्या पहिल्या हंगामात इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावून सर्वांना आश्चर्यचकित केले.

जोस बटलर

2016 आणि 2022 मधील विराट आणि बटलरच्या फलंदाजीतील आकडेवारी -

विराट कोहली (2016) VS जोस बटलर (2022)
धावा 973 824*
0s: 169 217
1s: 291 170
2s: 56 31
3s: 2 2
4s: 84 79
6s: 38 45
Balls: 640 544
Centuries: 4 4

आयपीएल 2022 मध्ये जोस बटलर सर्वाधिक धावा करणारा फलंदाज म्हणून उदयास आला. काही क्रिकेटच्या दिग्गजांनी असा दावा केला की, त्यांनी एका हंगामात कोणालाही इतकी चांगली कामगिरी करताना पाहिले नाही अपवाद विराट कोहलीचा ( Virat Kohli ). 2016 मध्ये विराट कोहलीने हा विक्रम केला होता. परंतु बटलरला विराटच्या सर्वाधिक धावाच विक्रम मोडता आला नाही. आयपीएलच्या स्थापनेपासून सर्वाधिक धावा करणाऱ्या कोहलीला या हंगामात खराब फॉर्मचा सामना करावा लागला. त्याची सर्वोत्तम कामगिरी 2016 मध्ये झाली, जेव्हा त्याने चार आश्चर्यकारक शतकांसह 973 धावा केल्या होत्या.

विराट कोहली

विराट कोहलीने 29 मे 2016 साली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे, त्याने एका हंगामात 973 धावा करताना सर्वाधिक धावांचा विक्रम केला आहे. या हंगामात त्याने सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक चौकाराचा पुरस्कार जिंकला होता. परंतु या हंगामात त्याच्या रॉयल चॅलेंजर्स संघाला फायनल सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता.

2022 मध्ये त्याच दिवशी, राजस्थान रॉयल्सचा जोस बटलर 863 धावा करताना सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला, ज्यामुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. त्याला सर्वाधिक षटकार आणि सर्वाधिक चौकारांचा पुरस्कार देण्यात आला. परंतु विराट कोहली प्रमाणे जोस बटलरला गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देताना आला नाही आणि संघाला फायनल सामन्यात पराभव पत्कारावा लागला.

हेही वाचा -IPL 2022 : आयपीएलच्या पंधरा हंगामातील चकीत करणारी पाच महत्वाची आकडेवारी

ABOUT THE AUTHOR

...view details