पुणे:आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 29 वा सामना गेलेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Gujarat Titans vs Chennai Super Kings ) संघात एमसीए स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सने चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवला ( Gujarat Titans Beats Chennai Super Kings ) आहे. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) फलंदाज अंबाती रायडूची 46 धावांची खेळी व्यर्थ ठरली. मात्र, यासह त्याने आयपीएलमध्ये आपल्या 4 हजार धावा पूर्ण केल्या ( Ambati Rayudu completes 4,000 runs ) आहेत. आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा 36 वर्षीय रायडू हा 10 वा भारतीय फलंदाज ठरला आहे.
अंबाती रायुडू, ज्याने 55 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि त्याची सरासरी 47.05 आहे. त्याची 2018 साली चेन्नई सुपर किंग्जने निवड केली होती आणि आयपीएल 2022 पूर्वी पुन्हा एकदा संघाने त्याला आपल्या संघात सामिल केले. त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी 127.88 च्या स्ट्राइक रेटने 1,628 धावा केल्या आहेत. माजी सीएसके फलंदाज सुरेश रैना (5529) आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ( Former captain Mahendra Singh Dhoni ) ही कामगिरी केली आहे.