मेलबर्न - भारत आणि इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघात 21 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या काळात कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवण्यात येणार आहे. यात तीन एकदिवसीय, एक कसोटी आणि तीन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. उभय संघातील या मालिकांसाठी ऑस्ट्रेलियाची दिग्गज एलिसा हिली सज्ज झाली आहे. यासोबत तिची नजर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मावर आहे.
एलिसा हिली याचा नवरा ऑस्ट्रेलिया पुरूष संघाचा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्क आहे. स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 61 कसोटी, 99 एकदिवसीय आणि 41 टी-20 सामने खेळली आहेत. यात त्याने अनुक्रमे 255, 195 आणि 51 गडी बाद केले आहेत. याशिवाय त्याने फलंदाजीत कसोटीत 1 हजार 596, एकदिवसीयमध्ये 428 आणि टी-20 त 70 धावा केल्या आहेत. तर त्याची पत्नी एलिहा हिली याने फक्त 4 कसोटी सामने खेळली आहेत. तर टी-20 क्रिकेटमध्ये ती नवऱ्यापेक्षा जास्त अनुभवी आहे.
एलिसा हिलीची कसोटीत सर्वोच्च धावसंख्या 58 इतकी आहे. एकदिवसीयमध्ये तिचा हा आकडा 133 आहे. याशिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तिने नाबाद 148 धावांची खेळी केली होती. तिने 79 एकदिवसीय, 118 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहेत. भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ एक कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी एलिसा हिलीची निवड ऑस्ट्रेलिया संघात आहे. ती एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाची सलामीवीर आहे. अशात तिची नजर रोहित शर्मावर असणे सहाजिक आहे.
एलिसा हिली फॉक्स क्रिकेट सोबत बोलताना म्हणाली, एकदिवसीय आणि टी-20 मालिकेदरम्यान, कसोटी फॉर्मेटची तयारी करणे आव्हानात्मक होईल. हे काम खूप कठिण आहे. कारण माझ्याकडे फक्त चार कसोटी सामने खेळण्याचा अनुभव आहे. पण मी कसे खेळू याचा विचार करत बसणार नाही. याला मी सहज घेईन. मला वाटत की, स्वत:ला अधिक वेळ देण्याची क्षमता वाढवावी लागेल.