दुबई:ऑस्ट्रेलियन महिला संघाची स्टार यष्टीरक्षक-फलंदाज अॅलिसा हिली ( Star wicketkeeper-batsman Alyssa Healy ) आणि दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष संघाचा फिरकीपटू केशव महाराज ( Spinner Keshav Maharaj ) यांना सोमवारी त्यांच्या संबंधित श्रेणींमध्ये एप्रिल महिन्यासाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ ( ICC Player of the Month ) म्हणून घोषित करण्यात आले. हिलीने एप्रिलमध्ये क्राइस्टचर्च येथे झालेल्या महिला क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये 170 धावांची मॅच-विनिंग इनिंग खेळली होती. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील खेळाडूची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.
आयसीसीने जारी केलेल्या निवेदनात अॅलिसा हिलीने म्हटले आहे की, “मी दोन उत्कृष्ट खेळाडूंच्या पुढे जात महिन्याचा पुरस्कार नम्रपणे स्वीकार करते. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप ( ICC World Test Championship ) अंतर्गत घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या मालिकेत बांगलादेशविरुद्धच्या संघाच्या विजयाचा हिरो म्हणून दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज महाराज पुढे आला होता. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने 16 बळी घेतले, ज्यामध्ये दोन्ही कसोटींच्या दुसऱ्या डावात प्रत्येकी सात बळी घेतले होते. त्यामुळे त्याचा संघ दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकण्यात यशस्वी ठरला.
केशव महाराज ( Spinner Keshav Maharaj ) यांनी दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी मालिकेत 16 विकेट्स घेण्याचे योगदान दिले, ज्यामुळे त्याला मालिकावीर म्हणूनही निवडण्यात आले होते. त्याचबरोबर केशव महाराजाने पोर्ट एलिझाबेथ येथील दुसऱ्या कसोटी सामन्यातही 84 धावांची शानदार खेळी केली होती.