नवी दिल्ली -माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने ( Former cricketer Akash Chopra ) पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीझ राजाच्या आयपीएल आणि पीएसएल स्पर्धेबाबत केलेल्या वक्तव्यावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रमीझ राजाने आयपीएल प्रमाणे पीएसएल मध्ये ही लिलाव प्रक्रिया राबवण्यास प्रयत्न करणार असल्याचे म्हणले होते. त्यावर आता आकाश चोप्रा प्रतिक्रिया देताना म्हणाला, लिलाव प्रक्रिया सुरु केली, तरी पीएसएल स्पर्धेत कोणता ही खेळाडू 16 कोटीत खेळताना दिसणार नाही.
काही दिवसापूर्वी कराची स्टेडियममध्ये पत्राकारांसोबत बोलताना रमीझ राजा ( Statement of Rameez Raja ) म्हणाला होता की, आता पीएसएलची संकल्पना अधिक चांगली करण्याची वेळ आली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार ते ड्रॉफ्ट सिस्टम ऐवजी लिलाव पद्धत राबवणार आहेत. तो म्हणाला की, जेव्हा पाकिस्तानमध्ये क्रिकेटची इकॉनमी ( Pakistan Cricket Economy ) वाढेल, तेव्हा आमचा सन्मानही वाढेल. जर आम्ही पीएसएलमध्ये लिलाव मॉडेल लागू केले तर ते आयपीएलच्या श्रेणीत येईल. तेव्हा आम्ही बघू कोण पीएसएल सोडून आयपीएल खेळायला जातो.
पीएसएलमध्ये आयपीएल इतके पैसे येऊ शकणार नाहीत - आकाश चोप्रा