मुंबई :भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मासाठी (Indian captain Rohit Sharma) भविष्यात प्रत्येक सामन्यात तंदुरुस्त राहणे हे आव्हान असल्याचे मत भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकर याने व्यक्त केले आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेला ६ फेब्रुवारीपासून अहमदाबादमध्ये सुरुवात होणार आहे. नियमित कर्णधार झाल्यानंतर शर्माची ही पहिलीच मालिका आहे.
आगरकर म्हणाले, माझ्या मते ही चांगली आणि योग्य गोष्ट आहे. पांढऱ्या चेंडूच्या फॉरमॅटसाठी कर्णधार असणे ही मोठी गोष्ट आहे. त्यामुळे माझ्या मते रोहित शर्मासाठी तंदुरुस्त राहणे आणि सर्वकाही व्यवस्थापित करणे हे आव्हान असेल. तुम्हाला तंदुरुस्त कर्णधार हवा आहे, असे आगरकरने स्टार स्पोर्ट्सवरील गेम प्लॅन शोमध्ये सांगितले.
याआधी विराट कोहली आणि एमएस धोनी दोघेही खूप फिट होते. ते क्वचितच एखादा सामना खेळू शकले नाहीत. 2020 च्या सुरुवातीपासून शर्माला विविध दुखापतींनी ग्रासले (Sharma suffered various injuries) आहे. ज्यामुळे महत्त्वाचे परदेश दौऱ्याला तो मुकला आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये, ओव्हल येथे झालेल्या पाचव्या टी-20 सामन्यामध्ये दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला होता.