महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Cricketer Umran Malik : जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांनी घेतली उमरान मलिकच्या कुटुंबाची भेट - Sports News

जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा ( Deputy Governor Manoj Sinha ) यांनी मलिक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि काश्मीरच्या तरुण उमरान मलिकची भारतीय क्रिकेटच्या T20 संघात निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

Umran Malik
Umran Malik

By

Published : May 25, 2022, 4:22 PM IST

श्रीनगर : काही दिवसापूर्वी बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी ( T20 series against South Africa ) भारतीय संघाची घोषणा केली. ज्यामध्ये जम्मू-काश्मीरचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकची निवड ( Umran Malik selected for Indian team ) करण्यात आली. ज्यामुळे त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. आता जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपराज्यपाल मनोज सिन्हा ( JK Deputy Governor Manoj Sinha ) म्हणाले की, जम्मू-काश्मीर सरकार उमरान मलिकचे प्रशिक्षण आणि इतर सुविधांची काळजी घेईल. उमरान मलिकने देशाचा गौरव केला आहे. जम्मू-काश्मीर सरकार त्यांच्या प्रशिक्षणाची काळजी घेईल. क्रीडा धोरणात खेळाडूंना सरकारी नोकऱ्या देण्याची तरतूद आधीच आहे. त्यामुळे जेव्हा त्याला रुजू व्हायचे असेल, तेव्हा त्याला सरकारी नोकरी दिली जाईल.

सिन्हा म्हणाले, "त्याची उल्लेखनीय कामगिरी संपूर्ण जम्मू आणि काश्मीरसाठी अभिमानाची बाब आहे. आणि ते केंद्रशासित प्रदेशातील अनेक तरुणांना त्यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यासाठी आणि जम्मू-काश्मीर आणि देशाला गौरव मिळवून देण्यासाठी प्रेरित करेल." मलिकला राष्ट्रीय संघासाठी कॉल-अप म्हणजे त्याच्यासाठी पहिला पुरस्कार आहे. आयपीएलच्या या मोसमात सनरायझर्स हैदराबादकडून 13 सामन्यांत 21 बळी घेतल्यानंतर काश्मीरच्या गोलंदाजाची निवड करण्यात आली.

उमरान 9 जूनपासून मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळणार आहे. एलजीच्या कार्यालयाने ट्विट केले होते की, "दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी टीम इंडियात निवड झाल्याबद्दल उमरान मलिकचे हार्दिक अभिनंदन. जम्मू-काश्मीरसाठी अभिमानाचा क्षण.''

हेही वाचा -IPL 2022 Eliminator LSG vs RCB : लखनौच्या सुपरजायंट्सला एलिमिनेटरमध्ये आज बंगळुरुच्या रॉयलचे चॅलेंज

ABOUT THE AUTHOR

...view details