महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

गाठ तुटली! शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांचा लग्नाच्या 8 वर्षानंतर घटस्फोट - Shikhar dhawan wife Ayesha divorce

टीम इंडियाचा 'गब्बर' खेळाडू शिखर धवन आणि त्याची पत्नी आयशा मुखर्जी विभक्त झाल्याची माहिती समोर आली आहे. याची माहिती खुद्द आयशा मुखर्जीनं दिली आहे. 2012मध्ये शिखर धवन आणि आयशा यांचा विवाह झाला होता.

After giving divorce Shikhar Dhawan pens down heartwarming post for wife Ayesha
शिखर धवन आणि आयशा मुखर्जी

By

Published : Sep 8, 2021, 9:30 AM IST

मुंबई -भारतीय सलामीवीर शिखर धवन आणि आयशा मुखर्जी यांनी लग्नाच्या आठ वर्षांनंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती खुद्द आयशा मुखर्जीनं एक भावूक पोस्ट लिहत दिली आहे. मात्र, यावर अद्याप धवनची प्रतिक्रिया आली नाही. दोघांच्या या निर्णयानं सर्वांना मोठा धक्का बसला आहे. तसेच शिखर आणि आयशा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. एवढेच नाही तर आयशाने तिच्या फीडमधून शिखरचे सर्व फोटो सुद्धा हटवले आहेत.

आयशाने घटस्फोट घेतल्याचे एक पोस्ट शेअर करत सांगितलं.

आयशा आणि धवनची फेसबूकवर मैत्री झाली आणि त्यानंतर दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. शिखर धवन आणि आयशा यांचा विवाह 2012 मध्ये झाला होता. 2014 मध्ये दोघांना पुत्ररत्नही झालं होतं. आयशाचे हे दुसरे लग्न होते. शिखर धवन आधी आयशा मुखर्जीने एका ऑस्ट्रेलियन बिझनेसमन सोबत पहिलं लग्न केलं होतं. मात्र, ते यशस्वी झाले नाही. पहिल्या पतीपासून तीला दोन मुली होत्या. त्या दोन्ही मुलींना शिखरने आपले नाव दिले होते. दोन मुली असलेल्या महिलेसोबत लग्न करत असल्यामुळे तेव्हा शिखरला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पाठिंबा दिला होता. आयशाशी लग्न केल्यानंतर आपले आयुष्य कसे बदलले याबद्दल धवनने वेळोवेळी भाष्य केले आहे. मात्र, आता त्यांनी घटस्फोट का घेतला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

भारतात जन्मलेल्या आयशाकडे दुहेरी नागरिकत्व आहे. तिचे वडील बंगाली तर आई ब्रिटीश होती. बंगालमध्ये एकत्र काम करताना त्यांचं प्रेम जुळलं आणि त्यांनी लग्न केलं. आयशाच्या जन्मानंतर ते ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाले. आयशा प्रोफेशनल किक बॉक्सर आहे. धवन आयशापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे.

हेही वाचा -Happy Birthday Shikhar : 'गब्बर'वर क्रिकेटविश्वातून शुभेच्छांचा वर्षाव...!

ABOUT THE AUTHOR

...view details