कराची: सध्या पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया ( Pakistan v Australia ) संघात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना अनिर्णाीत पार पडला आहे. तसेच आता या मालिकेतील दुसरा सामना शनिवारी सुरु होणार आहे. या अगोदर रावळपिंडीतील खराब सलामीच्या कसोटीनंतर, आयसीसीचे सामनाधिकारी रंजन मदुगले यांनीही खेळपट्टीला 'सरासरीपेक्षा कमी' रेट दिले आहे. ऐतिहासिक मालिकेतील दुसरा सामना खेळण्यासाठी दोन्ही संघात काही बदल केले जाऊ शकतात.
रावळपिंडीतील ऐतिहासिक कसोटीत ( Historic Rawalpindi Test match ) सामन्यात पाच दिवसांत फक्त 14 विकेट पडल्या होत्या. त्यामुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन्ही संघातील खेळाडूंना चांगली खेळपट्टी मिळेल, अशी आशा आहे. दुस-या कसोटीपर्यंत पाच दिवसीय क्रिकेटसाठी अधिक अनुकूल खेळपट्टी असल्याने, दोन्ही संघ चांगले निकाल लावण्यासाठी आपल्या संघात काही नवीन चेहरे जोडण्याचा प्रयत्न करतील.
हसन अली, हरिस रौफ आणि अष्टपैलू फहीम अश्रफ यांच्यासोबत पाकिस्तान त्यांच्या वेगवान आक्रमणात फेरबदल करू शकतो. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला परिस्थितीनुसार दुसरा फिरकी गोलंदाज जोडण्याची अपेक्षा आहे.
इतिहास सांगतो की या स्पर्धेत पाकिस्तानला पराभूत करणे कठीण असणार आहे. कारण यजमानांनी नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 43 कसोटी सामन्यांपैकी केवळ 23 सामने जिंकले आहेत आणि फक्त दोन गमावले आहेत. ऑस्ट्रेलियाचा आयोजन स्थळावर खराब रिकॉर्ड आहे आणि या मैदानावर आठ प्रयत्नांत एकही कसोटी जिंकता आलेली नाही. आयसीसीनुसार, ऑस्ट्रेलिया सध्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्टँडिंगमध्ये 77.77 च्या विजयाच्या टक्केवारीसह अव्वल आहे. त्याचबरोबर पाकिस्तान 66.66 च्या विजयाच्या टक्केवारीसह दुसऱ्या स्थानावर आहे.