महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोनामुळे २ वेळा लग्न पुढं ढकललं, पट्ट्याने अखेरीस गुपचूप उरकला विवाह - अॅडम झम्पाचे लग्न

आपण ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाविषयीच बोलतोय. मागील वर्षी कोरोनामुळे जेव्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. तेव्हा झम्पाने त्याचे लग्न पुढे ढकलले. त्यानंतर दुसऱ्या लाटेत देखील त्याला लग्न पुढे ढकलावे लागले. झम्पाने अखेरीस तिची गर्लफ्रेंड हॅटी पाल्मेर हिच्या लग्नगाठ बांधली.

adam-zampa-finally-gets-married-to-his-longtime-girlfriend-after-postponing-for-two-times
कोरोनामुळे २ वेळा लग्न पुढं ढकललं, पट्ट्याने अखेरीस गुपचूप उरकला विवाह

By

Published : Jun 21, 2021, 8:38 PM IST

मुंबई - कोरोना प्रादुर्भावामुळे अनेकांना आपली लग्न पुढे ढकलावी लागली आहे. यातून क्रिकेटर देखील सुटलेले नाहीत. ऑस्ट्रेलियाच्या एका क्रिकेटपटूला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे त्याचे लग्न एक नाही तर तब्बल दोन वेळा पुढे ढकलावे लागले होते. पण पट्ट्याने अखेरीस चंग बांधला आणि लग्न केलं.

होय, आपण ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू अॅडम झम्पाविषयीच बोलतोय. मागील वर्षी कोरोनामुळे जेव्हा लॉकडाऊन घोषित करण्यात आला होता. तेव्हा झम्पाने त्याचे लग्न पुढे ढकलले. त्यानंतर दुसऱ्या लाटेत देखील त्याला लग्न पुढे ढकलावे लागले. झम्पाने अखेरीस तिची गर्लफ्रेंड हॅटी पाल्मेर हिच्या लग्नगाठ बांधली.

विशेष म्हणजे, झम्पाने लग्नाविषयीची माहिती दिली नाही. त्याने गुपचूच लग्न उरकलं. पण झम्पाच्या लग्नाचा ड्रेस डिजाइन केलेल्या कंपनीने अॅडम-हॅरी यांच्या लग्नाचा फोटो शेअर केला. त्यानंतर झम्पाने मागील आठवड्यात लग्नगाठ बांधल्याचे समोर आले.

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी झम्पाची निवड

ऑस्ट्रेलियाचा संघ लवकरच वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी झम्पाची निवड ऑस्ट्रेलिया संघात झाली आहे. दरम्यान, झम्पा आयपीएलमधून अचानक माघार घेत मायदेशी परतल्याने चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत केन रिचर्डनसन देखील होता.

हेही वाचा -मराठमोळ्या स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटकरी घायाळ, सोशल मीडियावर केवळ स्मृतीचीच चर्चा

हेही वाचा -WTC Final: पावसाचा खेळखंडोबा, जेमिसन रंगला टेबल टेनिस खेळात; चाहते म्हणाले, हे तरी लाईव्ह दाखवा

हेही वाचा -WTC Final : यापेक्षा काय थरारक काय असेल?, ICCने शेअर केला भारतीय गोलंदाजाचा 'सुपरफास्ट' मारा

ABOUT THE AUTHOR

...view details