मुंबई:रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा ( Royal Challengers Bangalore team ) संघ सलग तिसऱ्या वर्षी आयपीएलच्या प्लेऑफमध्ये दाखल झाला आहे. आयपीएल 2022 मधील प्लेऑफमध्ये दाखल होणारा आरसीबी चौथा संघ आहे. त्यानंतर आरसीबी संघासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा हॉल ऑफ फेमर एबी डिव्हिलियर्सने पुष्टी केली आहे की, तो पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी फ्रेंचायझीमध्ये परतणार ( AB de Villiers will return to IPL ) आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी महान खेळाडू एबी डिव्हिलियर्सला काही दिवसापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्यांच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश केला आहे. तो पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी फ्रेंचायझीमध्ये परतणार आहे. काही महिन्यांपूर्वी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डिव्हिलियर्सने आयपीएल 2022 मध्ये भाग घेतला नाही, ज्यामध्ये आरसीबी बुधवारी त्यांचा एलिमिनेटर सामना खेळणार आहे. तो म्हणाला की तो कोणत्या रूपात परतणार आहे हे अद्याप माहित नाही.
डिव्हिलियर्सने व्हीयूएसपोर्टला सांगितले की, मी पुढील वर्षी आयपीएलमध्ये नक्कीच परतेन. मला माझ्या दुसऱ्या घरी परतायला आवडेल. मी पुढील वर्षी आरसीबीमध्ये परतेन, मला ती खंत जाणवत आहे. मी कोणत्या रुपात परतेन हे माहित नाही, पण मला माझे दुसरे घर चिन्नास्वामी स्टेडियमला भेट द्यायला आवडेल. मी त्याची वाट पाहत आहे. काही दिवसांपूर्वी त्याला वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलसह आरसीबी हॉल ऑफ फेममध्ये सामील करण्यात आले होते.