हैदराबाद -आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला आजपासून सुरुवात होणार ( IPL 2022 ) आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता ( CSK VS KKR ) यांच्यात पहिला सामना पार पडणार आहे. 2008 साली सुरु झालेल्या इंडियन प्रिमीयर लीगचा फंडा सुपरहिट ठरला आहे. मात्र, तेवढाच वादग्रस्तही आहे. पहिल्या हंगामापासून क्रिकेटपेक्षा आयपीएलमधील वादांचीच जास्त चर्चा आहे. मग ते हरभजन सिंगने श्रीसंतला मारलेली थापड अथवा ललित मोदींचे निलंबन असो. आयपीएलच्या विश्वाला वेगळा तडका देणाऱ्या या वादविवादांबाबात ( Controversy in IPL ) आपण जाणून घेणार आहोत.
1. 2008 साली हरभजनसिंगने-श्रीसंतच्याश्रीमुखात लावली -हरभजन आणि वादविवाद यांचे नाते आहे. आयपीएलच्या पहिल्याच हंगामात जबरदस्त वाद झाला होता. मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात झालेल्या सामन्यानंतर श्रीसंतला अचानक रडताना दाखविण्यात आले आहे. श्रीसंत हरभजनला काहीतरी विनोदात म्हणाला होता. मात्र, हा विनोद हरभजनला सहन झाला नाही. त्याने त्याच्या कानाखाली लगावून दिली.
2. 2010 साली ललित मोदीला हटवले -ललित मोदी हे आयपीएलचे पहिले अध्यक्ष होते. गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर त्यांना बरखास्त करण्यात आले आहे. तपसाअंती त्यांना दोषी ठरवण्यात आले. 2013 साली त्यांच्यावर आजीवन बंदी घातली गेली. ललित मोदी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले. तसेच, अंमलबजावणी संचालनालयाने त्यांचा तपास करण्यापूर्वीचे ते लंडनला पळून गेले.
3. 2012 साली शाहरुखला वानखेडेवर प्रवेशबंदी -कोलकाता नाईट रायडर्सचा मालक शाहरुख खान 2012 साली मोठ्या वादात अडकला होता. मुंबई इंडियन्सचा कोलकाता सोबत सामना झाल्यानंतर त्याचा वानखेडे स्टेडियमच्या सुरक्षा रक्षकांसोबत वाद झाला होता. सुरक्षा रक्षकांनी मुलांसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप शाहरुखने केला होता. मात्र, मुंबई क्रिकेट असोसिएशनने शाहरुखवर वानखेडेमध्ये 5 वर्षांची बंदी घातली होती.