महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ऑलआऊट होणारे ४ संघ; जाणून घ्या एका क्लिकवर - Royal Challengers Bangalore

मंगळवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. मुंबईने हा सामना १० धावांनी जिंकला. परंतु या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संघ १५२ धावांवर ऑलआऊट झाला. अशा प्रकारे मुंबईचा संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत १६ वेळा ऑलआऊट झाला.

4 teams most times all out in ipl
आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ऑलआऊट होणारे ४ संघ; जाणून घ्या एका क्लिकवर

By

Published : Apr 14, 2021, 5:05 PM IST

मुंबई -आयपीएलचा चौदावा हंगाम सुरू आहे. यात मंगळवारी गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना पार पडला. मुंबईने हा सामना १० धावांनी जिंकला. परंतु या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा संघ १५२ धावांवर ऑलआऊट झाला. अशा प्रकारे मुंबईचा संघ आयपीएलमध्ये आतापर्यंत १६ वेळा ऑलआऊट झाला आहे. या लेखात आज आम्ही तुम्हाला मुंबई इंडियन्स वगळता असे चार संघ सांगणार आहोत, जे आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ऑलआऊट झाले आहेत.

  • दिल्ली कॅपिटल्स -

आयपीएल इतिहासात सर्वाधिक वेळा ऑलआऊट होणारा संघ दिल्ली कॅपिटल्स आहे. दिल्लीने आतापर्यंत १९५ सामने खेळली आहेत. यात ते २३ वेळा ऑलआऊट झालेले आहेत.

दिल्ली कॅपिटल्स
  • राजस्थान रॉयल्स -

आयपीएलच्या पहिल्या हंगामाचा विजेता रॉयस्थान रॉयल्स देखील या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. राजस्थानचा संघाने आतापर्यंत एकूण १२ हंगामात खेळताना १६२ सामने खेळली आहेत. यात ते १९ वेळा ऑलआऊट झालेले आहेत.

राजस्थान रॉयल्स
  • रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू -

विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाची विजेतेपदाची पाटी अद्याप कोरीच आहे. एकपेक्षा एक सरस फलंदाज असून देखील बंगळुरूचा संघ आयपीएलमधील १९७ सामन्यात १९ वेळा ऑलआऊट झालेला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
  • पंजाब किंग्ज -

बॉलीवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिची मालकी असलेल्या पंजाब किंग्जचा संघ देखील अद्याप स्पर्धेचे विजेतेपद पटकावू शकलेला नाही. या संघात अनेक दिग्गज खेळाडू खेळले आहेत. तरीदेखील आयपीएलमध्ये पंजाबचा संघ १६ वेळा ऑलआऊट झालेला आहे.

पंजाब किंग्ज

हेही वाचा -ब्रेकिंग! अक्षर पटेलनंतर दिल्ली कॅपिटल्सच्या 'या' खेळाडूला कोरोनाची लागण

हेही वाचा -IPL २०२१ : सनरायजर्स हैदराबाद VS रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हेड टू हेड रिकॉर्ड आणि विक्रम

Conclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details