जयपूर - राजस्थानचा माजी रणजीपटू विवेक यादव याचे कोरोनाने निधन झाले. अवघ्या ३६ व्या वर्षी विवेकने जगाचा निरोप घेतला. त्याच्या पश्चात पत्नी आणि लहान मुलगी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विवेकला कॅन्सर झाला होता. जयपूरमधील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. यादरम्यान, त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. यात त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. बुधवारी विवेकने अखेरचा श्वास घेतला.
भारतीय संघाचा माजी सलामीवीर फलंदाज आणि समालोचक आकाश चोप्राने ट्विट करत विवेकच्या निधनाची माहिती दिली. त्याने लिहलं की, 'राजस्थानचा रणजीपटू खेळाडू आणि माझा जवळचा मित्र विवेक आता या जगात राहिला नाही. देव त्याच्या आत्म्यास शांती देऊ. माझ्या संवेदना विवेकच्या कुटुंबियांसोबत आहेत.'