महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

स्वप्न भंगलं..! साई प्रणीतचा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पराभव, कांस्य पटकावत केला विक्रम - जागतिक बॅडमिंटन स्पर्धा २०१९

भारतीय साई प्रणीत आणि जपानच्या मोमोटो यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यात जपानी खेळाडूने बाजी मारली. मोमोटो याने प्रणीतचा २१-१३, २१-८ असा पराभव केला.

स्वप्न भंगलं..! साई प्रणीतचा जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पराभव, कांस्य पटकावत केला विक्रम

By

Published : Aug 24, 2019, 6:16 PM IST

बासेल - भारताचा स्टार बॅडमिंटनपटू साई प्रणीत याला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभूत व्हावे लागले. जपानचा खेळाडू केंन्टो मोमोटा याने प्रणीतचा पराभव केला. या पराभवाबरोबरच प्रणीतचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मात्र, तो जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये ३६ वर्षानंतर पदक जिंकणारा भारताचा दुसरा खेळाडू ठरला आहे.

भारताचे दिग्गज खेळाडू प्रकाश पादुकोण यांनी ३६ वर्षांपूर्वी म्हणजे १९८३ साली जागतिक बॅडमिंटन स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकले होते.

भारतीय साई प्रणीत आणि जपानच्या मोमोटो यांच्यामध्ये रंगलेल्या सामन्यात जपानी खेळाडूने बाजी मारली. मोमोटो याने प्रणीतचा २१-१३, २१-८ असा पराभव केला.

ABOUT THE AUTHOR

...view details