बँकॉक - स्पेनची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती खेळाडू कॅरोलिना मारिन हिने थायलंड ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात तिनेकोरियाच्या सातव्या मानांकित ए से यंग हिचा पराभव केला.
मरिन आणि यंग यांच्यातील सामना रोमांचक राहिला. यातील पहिला गेम कॅरोलिया हिने २१-१९ अशा फरकाने जिंकला. यानंतर दुसरा गेम देखील तिने २१-१५ ने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली.
मरिन जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पाचव्या स्थानी आहे. थायलंडमध्ये सलग दुसरी स्पर्धा जिंकण्याच्या उद्देशाने तिने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. याआधी तिने मागील आठवड्यात खेळवण्यात आलेली बीडब्लूएफ सुपर १००० इव्हेंट स्पर्धा जिंकली होती.