मुंबई - बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. ज्वाला तिचा बॉयफ्रेंड व प्रसिद्ध अभिनेता विष्णू विशाल याच्यासोबत लग्न करणार आहे. लग्नाबाबतची माहिती विष्णू विशालने त्याचा आगामी चित्रपट अरण्याच्या प्री रिलीज कार्यक्रमात दिली.
विष्णू विशाल व ज्वाला गुट्टा हे मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते कायम त्यांचे रोमॅन्टिक फोटो शेअर करत असतात. विष्णूने गेल्या वर्षी ज्वाला गुट्टाच्या वाढदिवशी ७ सप्टेंबर २०२० रोजी तिला प्रपोज केले होते.