महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बॅडमिंटनपरी ज्वाला गुट्टाचे 'शुभमंगल सावधान', दोघांचाही दुसरा घरोबा - Vishnu Vishal

भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आज प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशाल याच्यासोबत लग्नबंधनात अडकली.

Vishnu Vishal and Jwala Gutta get married
बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा अडकली लग्नबंधनात

By

Published : Apr 22, 2021, 5:05 PM IST

Updated : Apr 22, 2021, 5:41 PM IST

मुंबई - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आज प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विष्णू विशाल याच्यासोबत लग्नबंधनात अडकली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला.

विशाल आणि ज्वाला गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे त्यांच्या सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करत असताना अनेकदा पाहायला मिळाले आहेत. या दोघांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लग्न पत्रिका पोस्ट त्यांच्या लग्नाची तारीख सांगितली होती.

ज्वाला आपल्या नातेवाईकांसह

लग्नाच्या एक दिवसआधी २१ एप्रिल रोजी हैदराबादमध्ये ज्वाला आणि विष्णू यांच्या मेहंदी आणि हळदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो ज्वालाने त्याच्या इन्साग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. या फोटोत ज्वाला त्याचे मित्र आणि पाहुण्यांसोबत पाहायला मिळत आहे. हळदी कार्यक्रमात विष्णूने पारंपरिक पद्धतीचा कुर्ता पायजमा घातला होता. तर ज्वाला पिवळ्या रंगाच्या लेहंग्यामध्ये पाहायला मिळत आहे.

ज्वाला-विष्णू यांच्या हळदी कार्यक्रमातील फोटो

कोण आहे विशाल?

विष्णू विशाल हा तमिळ सिनेमाचा एक मोठा स्टार आहे. चित्रपटाच्या जगाशिवाय तो आपल्या भव्य शरीर यष्टीबाबत खूप चर्चेत असतो. तो लवकरच दक्षिणेतील सर्वात मोठा सुपरस्टार असणाऱ्या राणा दुग्गूबातीसमवेत 'अरण्या' या चित्रपटात दिसणार आहे.

पहिल्या लग्नानंतर दोघांचेही घटस्फोट

विष्णू विशाल आणि ज्वाला गुट्टा या दोघांनी पहिल्या लग्नानंतर घटस्फोट घेतलेला आहे. विशालने प्रथम रजनीशी लग्न केले. इतकेच नाही तर त्याला एक मुलगा देखील आहे, ज्याचे नाव आर्यन आहे. तथापि, मतभेदांमुळे या दोघांचा घटस्फोट २०१८ मध्ये झाला. त्याच वेळी ज्वालाचे चेतन आनंदशी लग्न झाले आणि २०११ मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला आहे.

Last Updated : Apr 22, 2021, 5:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details