बासेल - डेन्मार्कचा बॅडमिंटनपटू विक्टर अक्सेलसन याने स्वीस ओपन स्पर्धा जिंकली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या विक्टरने अंतिम सामन्यात थायलंडच्या कुन्लावुत वितिदसर याचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.
विक्टरने अवघ्या ४७ मिनिटात सामना जिंकला. विक्टर आणि कुन्लावुत यांच्यातील हा तिसरा सामना होता. या तीनही सामन्यात विक्टरने विजय मिळवला आहे. विक्टरने अंतिम सामना २१-१६, २१-६ अशा फरकाने जिंकत विजेतेपदावर मोहोर उमटवली.
मिश्र दुहेरीत फ्रान्सच्या थार्म गिव्केल आणि डेल्फिन डेल्यू या जोडीने बाजी मारली. अंतिम सामन्यात या जोडीने डेन्मार्कच्या मथायस क्रिस्टेनसेन आणि अलेक्सजेड्रा बोज या जोडीचा २१-१९, २१-१९ ने पराभव केला.