महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताच्या माजी बॅडमिंटनपटूला ब्रेन ट्यूमर

१ फेब्रुवारी १९७२रोजी आसाममध्ये जन्मलेल्या दिपांकर भट्टाचार्जी यांनी १९९२ बार्सिलोना आणि १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. ४९ वर्षीय भट्टाचार्जी तीनवेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेत तर, दोनवेळा ते उपविजेते राहिले आहेत.

By

Published : Feb 3, 2021, 6:57 AM IST

Updated : Feb 3, 2021, 3:40 PM IST

दिपांकर भट्टाचार्जींना ब्रेन ट्यूमरचे निदान
दिपांकर भट्टाचार्जींना ब्रेन ट्यूमरचे निदान

नवी दिल्ली - दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले बॅडमिंटनपटू दिपांकर भट्टाचार्जींना ब्रेन ट्यूमरचे निदान झाले आहे. त्यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उद्या गुरुवारी मेंदुची शस्त्रक्रिया होणार आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) ही माहिती दिली.

दिपांकर भट्टाचार्जींना ब्रेन ट्यूमरचे निदान

हेही वाचा - IND vs ENG: नासिर हुसेनचे भाकित, 'हा' संघ जिंकणार कसोटी मालिका

१ फेब्रुवारी १९७२रोजी आसाममध्ये जन्मलेल्या दिपांकर भट्टाचार्जी यांनी १९९२ बार्सिलोना आणि १९९६च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धांसह अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे ४९ वर्षीय भट्टाचार्जी तीनवेळा राष्ट्रीय चॅम्पियन तर, दोनवेळा ते उपविजेते राहिले आहेत. बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये ते प्री क्वार्टर फेरीपर्यंत पोहोचले होते. २००४मध्ये त्यांनी बॅडमिंटनमधून निवृत्ती घेतली.

Last Updated : Feb 3, 2021, 3:40 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details