टोकियो - रिओ ऑलिम्पिक 2016 ची रौप्य पदक विजेती पी. व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिकधील विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. तिने दुसऱ्या फेरीतील सामन्यात हाँगकाँगच्या चेयूंग नगन यी हिचा पराभव केला. आज झालेला हा सामना सिंधूने 35 मिनिटात 21-9, 21-16 अशा फरकाने जिंकला. या विजयासह सिंधू उपउपात्यंपूर्व फेरीत पोहोचली आहे.
पी. व्ही. सिंधूकडून देशाला टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाची आशा आहे. ती बॅडमिंटन खेळामध्ये देशाला पदक जिंकून देण्यासाठी दावेदार आहे. सिंधूने देखील पहिले दोन सामने जिंकत आपण दावेदार असल्याचे ठणकावून सांगिलं आहे. तिने पहिल्या सामन्यात इज्राइलच्या पोलिकारपोवा कसेनिया हिचा 21-7, 21-10 अशा फरकाने पराभव केला होता. तर दुसरा सामना देखील सिंधूने एकतर्फा जिंकला.
सामन्यातील पहिल्या गेममध्ये चेयूंग नगन यी हिचा निभाव लागला नाही. सिंधूने प्रतिस्पर्धी खेळाडूला पाँईटचा दुहेरी आकडा गाठू दिला नाही. अवघ्या 15 मिनिटात सिंधूने हा गेम 21-9 अशा फरकाने जिंकला.