महाराष्ट्र

maharashtra

थायलंड ओपन : सात्विकसाईराज-चिरागचे आव्हान संपुष्टात

By

Published : Jan 23, 2021, 9:57 PM IST

सात्विकसाईराज-चिरागला मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मलेशियन जोडीने ३५ मिनिटांच्या सामन्यात भारतीय जोडीचा २१-१८, २१-१८ असा पराभव केला.

Thailand Open: Satwiksairaj Rankireddy-Chirag Shetty's Run Ends With Defeat In Semis
थायलंड ओपन : सात्विकसाईराज-चिरागचे आव्हान संपुष्टात

बँकॉक - टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदकाचे दावेदार मानल्या जाणाऱ्या भारताच्या सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला टोयोटा थायलंड ओपन सुपर १००० बॅडमिंटन स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. सात्विकसाईराज-चिरागला मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. मलेशियन जोडीने ३५ मिनिटांच्या सामन्यात भारतीय जोडीचा २१-१८, २१-१८ असा पराभव केला.

सात्विक आणि चिराग यांनी २०१९ मध्ये थायलंडमध्ये पहिले सुपर ५०० स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. त्यांनी फ्रेंच ओपन सुपर ७५० स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. दोघेही २०१८ आणि २०१९ मध्ये सुपर १००० स्पर्धेत खेळले होते.

या सामन्याच्या सुरुवातीला भारतीय जोडीने ४-२ अशी आघाडी मिळवली होती. परंतु मलेशियन जोडीने ११-१० असे शानदार पुनरागमन केले. दुसऱया गेममध्येही भारतीय जोडीने चांगली सुरुवात केली होती. मात्र, मलेशियाच्या जोडीने पुन्हा पुनरागमन करत सामना आपल्या हाती घेतला. एकेरीत भारताचे आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. या स्पर्धेतील मिश्र दुहेरीत सात्विकसाईराज आणि अश्विनी पोनप्पा यांचे आव्हान जिवंत आहे.

हेही वाचा - आनंद महिंद्रांची टीम इंडियाच्या नव्या शिलेदारांना 'महागडी' भेट

ABOUT THE AUTHOR

...view details