बँकाक- भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला बीडल्यूएफ वर्ल्ड टूर सुपर 500 स्पर्धेच्या थायलंड ओपनमध्ये पराभव स्वीकारावा लागला. आज गुरुवारी झालेल्या सामन्यात जपानच्या सयाका ताकाहाशी हिने सायनाचा पराभव केला. या पराभवाबरोबर सायनाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
थायलंड ओपन : 'फुलराणी'ला पराभवाचा धक्का, चार वेळा पराभव करणाऱ्या खेळाडूकडून सायना पराभूत - Sayaka Takahashi
जवळपास 48 मिनिटे चाललेल्या या सामन्यात ताकाहाशीने सायनाचा 16-21, 21-11, 21-14 असा पराभव केला. यापूर्वी सायना आणि ताकाहाशी यांच्यात 4 सामने झाले होते. या चारही सामन्यात सायनाने विजय मिळवला होता. मात्र आजच्या सामन्यात ताकाहाशी हिने सायनाचा पराभव करत धक्का दिला आहे.

पहिला गेम सायनाने 21-16 असा फरकाने आरामात जिंकला. त्यानंतर मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या गेममध्ये सायनाला अपेक्षित खेळ करता आला नाही. याचा फायदा घेत ताकाहाशी हिने आक्रमक खेळ करत सायनाचा पराभव केला.