थायलंड -भारताची अव्वल महिला शटलर पी.व्ही. सिंधू थायलंड ओपनच्या पहिल्या सामन्यात पराभूत झाली आहे. त्यामुळे सिंधुला या स्पर्धेतून गाशा गुंडाळावा लागला आहे. ७४ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सिंधूचा डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डने २१-१६, २४-२६, १३-२१ असा पराभव केला.
सिंधूने पहिला सेट जिंकला पण त्यानंतर ब्लिचफेल्डने जबरदस्त पुनरागमन करत सिंधुला पराभूत केले. तत्पूर्वी सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांनी थायलंड ओपनच्या दुसऱ्या फेरीत मजल मारली आहे. पहिल्या फेरीत सात्विक आणि पोनप्पाने इंडोनेशियाच्या हाफिज फैजल आणि ग्लोरिया इमानुएल विदजाचा २१-११, २७-२९, २१-१६ असा पराभव केला. हा सामना एका तास आणि १२ मिनिटे रंगला होता.