महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

डेंग्यूची लागण झाल्यामुळे चीन आणि कोरिया ओपनला प्रणॉय मुकणार

१७ ते २२ सप्टेंबर दरम्यान चांगझू येथे चीन ओपन तर, २४ ते २९ सप्टेंबर दरम्यान इंचियानला कोरिया ओपन स्पर्धा होणार आहे. मात्र, त्याआधीच प्रणॉय या स्पर्धेबाहेर पडला आहे. प्रणॉयने ट्विटर अकाऊंटवरुन डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली. तो म्हणाला, 'डेंग्यूची लागण झाल्यामुळे काही दिवसांकरिता खेळू शकणार नाही. पुढील आठवड्यात होणाऱ्या चीन आणि कोरिया ओपनसाठी भारतीय संघाचा मी हिस्सा असणार नाही. लवकरच मैदानात परतेन अशी आशा आहे.'

डेंग्यूची लागण झाल्यामुळे चीन आणि कोरिया ओपनला प्रणॉय मुकणार

By

Published : Sep 10, 2019, 9:18 AM IST

नवी दिल्ली - भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू एसएस प्रणॉयला डेंग्यूची लागण झाली आहे. त्यामुळे आगामी होणाऱ्या चीन आणि कोरिया ओपन स्पर्धेला तो खेळू शकणार नाही.

एसएस प्रणॉय

हेही वाचा -पाकिस्तानमध्ये क्रिकेट मालिका?.. 'नको रे बाबा'

१७ ते २२ सप्टेंबर दरम्यान चांगझू येथे चीन ओपन तर, २४ ते २९ सप्टेंबरला इंचियानला कोरिया ओपन स्पर्धा होणार आहे. मात्र, त्याआधीच प्रणॉय या स्पर्धेबाहेर पडला आहे. प्रणॉयने ट्विटर अकाऊंटवरुन डेंग्यूची लागण झाल्याची माहिती दिली. तो म्हणाला, 'डेंग्यूची लागण झाल्यामुळे काही दिवसांकरता खेळू शकणार नाही. पुढील आठवड्यात होणाऱ्या चीन आणि कोरिया ओपनसाठी भारतीय संघाचा मी हिस्सा असणार नाही. लवकरच मैदानात परतेन अशी आशा आहे.'

हेही वाचा -विश्व ‌अ‌ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा

बासेल येथे पार पडलेल्या विश्व चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याला केंतो मोमोताने हरवले होते. तत्पूर्वी, प्रणॉयने दिग्गज लिन डॅनला हरवले होते. दोन वेळेचा ऑलिम्पिक विजेता असलेला लीन डेन याने पाच वेळा जागतिक चॅम्पियनशिप पटकावली आहे. जागतिक क्रमवारीत ३० व्या क्रमांकावर असणाऱ्या प्रणॉयने लीन डेनला २१-११, १३-२१, २१-७ गेमने पराभूत केले होते. हा सामना प्रणॉयने एक तास आणि दोन मिनिटात जिंकला होता. आतापर्यंत प्रणॉयने लीन डेनला ३ वेळा पराभूत केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details