महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

सय्यद मोदी चॅम्पियनशिप : सौरभ, रितूपर्णा उपांत्य फेरीत, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात - सौरभ, रितूपर्णा मोदी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

यावर्षी हैदराबाद आणि व्हिएतनाम येथील दोन 'बीडब्ल्यूएफ सुपर १००' दर्जाच्या स्पर्धा जिंकणाऱ्या २६ वर्षीय सौरभने थायलंडच्या कुणलावत वितिदसर्नचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्यांची गाठ कोरियाच्या हीओ क्वांग ही याच्याशी होणार आहे.

Syed Modi International: Kidambi Srikanth crashes out, Sourabh Verma enters semifinal
सय्यद मोदी चॅम्पियनशिप : सौरभ, रितूपर्णा उपांत्य फेरीत, श्रीकांतचे आव्हान संपुष्टात

By

Published : Nov 30, 2019, 8:03 AM IST

लखनौ - सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मा आणि रितूपर्णा दास यांनी उपांत्य फेरी गाठली आहे. तर भारताचा स्टार खेळाडू किदम्बी श्रीकांतचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले आहे.

यावर्षी हैदराबाद आणि व्हिएतनाम येथील दोन 'बीडब्ल्यूएफ सुपर १००' दर्जाच्या स्पर्धा जिंकणाऱ्या २६ वर्षीय सौरभने थायलंडच्या कुणलावत वितिदसर्नचा २१-१९, २१-१६ असा पराभव केला. उपांत्य फेरीत त्यांची गाठ कोरियाच्या हीओ क्वांग ही याच्याशी होणार आहे.

किदाम्बी श्रीकांतची वाटचाल सन वॉन हू याने रोखली. तिसऱ्या मानाकिंत श्रीकांतचा सातव्या मानांकित सन वॉनने २१-१८, २१-१९ असा पराभव केला. महिला गटाच्या एकेरीत माजी राष्ट्रीय विजेत्या रितूपर्णाने भारताच्याच श्रुती मुंदडाचा २४-२६, २१-१०, २१-१९ असा पराभव केला. रितूपर्णाची शनिवारी उपांत्य फेरीत थायलंडच्या फिटायापोर्न चायवानशी गाठ पडणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details