लखनौ- येथे सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांत, बी. साईप्रणीत आणि एच. एस. प्रणॉय यांनी विजयी सुरुवात केली आहे.
श्रीकांतने पहिल्या फेरीत रशियाच्या व्लादिमिर माल्कोव्हचा २१-१२, २१-११ असा सरळ पराभव केला. त्याने हा सामना अवघ्या ३६ मिनिटात जिंकला. दुसऱ्या फेरीत त्याची भारताच्या पारुपल्ली कश्यपशी गाठ पडणार आहे. कश्यपला फ्रान्सच्या लुकास कॉर्वीविरुद्धच्या लढतीत पुढे चाल मिळाली आहे.
चौथ्या मानांकित साईप्रणीतने मलेशियाच्या इस्कांदर झुल्करनैनचा २१-१६, २२-२० असा पराभव केला. तर बिगरमानांकित प्रणॉयने चीनच्या लि शिया फेंग विरुध्द संघर्षपूर्ण लढतीत १८-२१, २२-२०, २१-१३ अशी बाजी मारली.