बासेल - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पुरूष बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यप यांना स्विस ओपन सुपर ३०० स्पर्धेत पहिल्या फेरीत गाशा गुंडळावा लागला. सायनाला थायलंडच्या तर कश्यपला स्पेनच्या खेळाडूने मात दिली.
ऑलिम्पिक विजेती सायनाचा ५८ मिनिटे रंगलेल्या सामन्यात थायलंडच्या २० वर्षीय फायटापोर्न चियावन हिने २१-१६, १७-२१, २३-२१ असा फरकाने पराभूत केले. तर कश्यपचा स्पेनच्या पाब्लो अबियान याने २१-१५, २१-१० असा सरळ पराभव झाला.