बासेल - भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूचे स्वीस ओपन स्पर्धेचे विजेतपद पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. अंतिम सामन्यात सिंधूचा पराभव झाला. स्पेनची रिओ ऑलिम्पिक विजेती खेळाडू कॅरोलिना मरिन हिने सिंधूचा पराभव करत विजेतेपदाला गवसणी घातली.
जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या मरिन हिने ३५ मिनिटात सिंधूचा पराभव केला. तिने २१-१२, २१-५ अशा फरकाने सामना जिंकला.
पहिल्या गेममध्ये मरिन पहिल्या ब्रेकपर्यंत ११-८ ने आघाडीवर होती. ब्रेकनंतर मरिनने आक्रमक खेळ करत १९-१० असा फरक निर्माण केला. मरिन समोर सिंधू हतबल ठरली. अखेरीस पहिला गेम मरिनने २१-१२ च्या फरकाने जिंकला. त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये तर तिने सिंधूला आव्हानच उभारू दिले नाही.