हाँगकाँग -भारताचा अव्वल पुरुष बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतचा हाँगकाँग बॅडमिंटन ओपन स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पराभव झाला. या पराभवामुळे भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे.
हेही वाचा -शेवटी 'तो' विक्रम मोडित निघाला !

शनिवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीकांतला हाँगकाँगच्या ली चेयुककडून पराभव पत्करावा लागला. ४२ मिनिटे चाललेल्या या सामन्यात चेयुकने जागतिक क्रमवारीत १३ व्या स्थानी असलेल्या श्रीकांतला २१-९, २५-२३ अशी मात दिली.
या विजयासह चेयुकने आपल्या पराभवाचा बदला घेतला आहे. गेल्या वर्षी इंडिया ओपनमध्ये श्रीकांतने चेयुकचा पराभव केला होता.