मुंबई - भारताची दिग्गज बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा आणि दाक्षिणात्य स्टार विष्णू विशाल यांचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. अभिनेता विष्णू विशालने सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही बातमी दिली.
विष्णू आणि ज्वाला या वर्षाच्या सुरूवातीपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता ज्वालाच्या वाढदिवसानिमित्त विष्णूने तिला लग्नासाठी प्रपोज करत साखरपुड्याची अंगठी दिली.
विशालने ज्वालासोबतचा साखरपुड्याचा फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्याने, वाढदिवसाच्या शुभेच्छा ज्वाला. आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. सकारात्मक राहुयात आणि आपल्या दोघांच्या उत्तम भविष्यासाठी मिळून प्रयत्न करुयात. तुम्हा सर्वांचे आशिर्वाद आणि प्रेम राहू द्या, असे म्हटलं आहे.