महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बॅडमिंटन : सौरभ वर्माने पटकावले व्हिएतनाम ओपन स्पर्धेचे जेतेपद - व्हिएतनाम स्पर्धेचे जेतेपद

जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानी असलेल्या सौरभने चीनच्या सुन फेई शिआंगला मात दिली. अंतिम सामन्यात त्याने  शिआंगचा २१-१२, १७-२१, २१-१४ असा पराभव केला. शिआंग जागतिक क्रमवारीत ६८व्या स्थानी आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये एक तास बारा मिनिटे हा सामना रंगला होता.

बॅडमिंटन : सौरभ वर्माने पटकावले व्हिएतनाम ओपन स्पर्धेचे जेतेपद

By

Published : Sep 15, 2019, 3:29 PM IST

नवी दिल्ली - सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या व्हिएतनाम ओपन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताच्या सौरभ वर्माने धडाका उडवला. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात सौरभने व्हिएतनाम स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे.

जागतिक क्रमवारीत ३८ व्या स्थानी असलेल्या सौरभने चीनच्या सुन फेई शिआंगला मात दिली. अंतिम सामन्यात त्याने शिआंगचा २१-१२, १७-२१, २१-१४ असा पराभव केला. शिआंग जागतिक क्रमवारीत ६८व्या स्थानी आहे. या दोन्ही खेळाडूंमध्ये एक तास बारा मिनिटे हा सामना रंगला होता.

हेही वाचा -नवीन प्रायोजक 'बायजू'सोबत विराटसेना आज पहिल्यांदाच मैदानात उतरणार

आत्तापर्यंत तीनवेळा हे दोन्ही खेळाडू एकमेकांसमोर आले आहेत. त्यापैकी दोन सामन्यात सौरभने विजय मिळवला आहे. यंदा झालेल्या हैदराबाद ओपन स्पर्धेत सौरभने शिआंगला मात दिली होती. सौरभने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत ६२ व्या स्थानी असलेल्या व्हिएतनामच्याच टिएन मिन्ह एनगुएनला हरवले होते. या सामन्यात सौरभने २१-१३, २१-१८ अशा सरळ सेटमध्ये एनगुएनला पराभूत केले. हा सामना ४३ मिनिटे रंगला होता. याआधीच्या झालेल्या दोन लढतीत एनगुएनने सौरभला मात दिली होती.

या स्पर्धेत भारतीय खेळाडूंपैकी फक्त सौरभने आपले आव्हान टिकवून ठेवले होते. त्याआधी भारताच्या सिरिल वर्मा आणि शुभांकर डे यांना स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता. जागतिक क्रमवारीत ९७ व्या स्थानी असलेल्या सिरिलने मलेशियाच्या डेरेन लियूला १७-२१, २१-१९, २१-१२ असे हरवले होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीअगोदरच्या सामन्यात त्याला चीनच्या लेइ लान शीने हरवले. दुसरीकडे, तिसऱ्या सीडेड शुभांकरला मलेशियाच्या जिया वेई टेनने ११-२१, १७-२१ असे हरवले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details