हाँगकाँग -भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने हाँगकाँग ओपनच्या मुख्य ड्रॉसाठी पात्रता मिळवली आहे. या स्पर्धेसाठी पात्रतेच्या पहिल्या सामन्यात सौरभने थायलंडच्या तानोनसाक एसला २१-१५, २१-१९ असे पराभूत केले.
हेही वाचा -अरे हे काय.. टी-२० दीपक चहरने नव्हे तर 'या' खेळाडूने घेतली पहिली 'हॅट्ट्रीक'
चार लाख डॉलर्सचे बक्षिस असणाऱ्या या स्पर्धेच्या दुसऱ्या सामन्यातही त्याने दमदार फॉर्म कायम ठेवत, फ्रान्सच्या लुकास क्लेरबाऊटचा सरळ गेममध्ये २१-१९, २१-१९ असा पराभव केला. पहिला पात्रता सामना जिंकण्यासाठी वर्माला ४५ मिनिटांचा अवधी लागला.
सौरभ वर्मा बुधवारी पुरुष एकेरी प्रकारातील पहिला फेरी सामना खेळेल. किदांबी श्रीकांत, बी साई प्रणीत, समीर वर्मा, एचएस प्रणय आणि पारुपल्ली कश्यप हेही या स्पर्धेत भाग घेणार आहेत.