महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

बॅडमिंटन : भारताच्या सौरभ वर्माची व्हिएतनाम ओपनच्या उपांत्य फेरीत धडक - sourabh verma in vietnam open

उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात सौरभने २१-१३, २१-१८ अशा सरळ सेटमध्ये एनगुएनला पराभूत केले. हा सामना ४३ मिनिटे रंगला होता. याआधीच्या झालेल्या दोन लढतीत एनगुएनने सौरभला मात दिली होती. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंपैकी फक्त सौरभने आपले आव्हान टिकवून ठेवले आहे. ५२ मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीअगोदरच्या सामन्यात त्याने जपानच्या यू इगार्शीला २५-२३, २४-२२ असे हरवले होते.

बॅडमिंटन - भारताच्या सौरभ वर्माची व्हिएतनाम ओपनच्या उपांत्य फेरीत धडक

By

Published : Sep 13, 2019, 7:46 PM IST

व्हिएतनाम - राष्ट्रीय विजेता सौरभ वर्माने सध्या सुरू असलेल्या व्हिएतनाम ओपनच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. दुसऱ्या सीडेड सौरभने जागतिक क्रमवारीत ६२ व्या स्थानी असलेल्या व्हिएतनामच्याच टिएन मिन्ह एनगुएनला हरवले.

हेही वाचा -राहुलने लक्ष्मणचा आदर्श घ्यावा, एम.एस.के. प्रसाद यांचा सल्ला

उपांत्यपूर्व फेरीच्या या सामन्यात सौरभने २१-१३, २१-१८ अशा सरळ सेटमध्ये एनगुएनला पराभूत केले. हा सामना ४३ मिनिटे रंगला होता. याआधीच्या झालेल्या दोन लढतीत एनगुएनने सौरभला मात दिली होती. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंपैकी फक्त सौरभने आपले आव्हान टिकवून ठेवले आहे. ५२ मिनिटे चाललेल्या उपांत्यपूर्व फेरीअगोदरच्या सामन्यात त्याने जपानच्या यू इगार्शीला २५-२३, २४-२२ असे हरवले होते.

हेही वाचा -तीन मुलांची आई किम क्लाइस्टर्स टेनिसच्या मैदानावर परतणार

गुरुवारी खेळल्या गेलेल्या इतर सामन्यांत सिरिल वर्मा आणि शुभांकर डे यांना पराभवाचा सामना करावा लागला. जागतिक क्रमवारीत ९७ व्या स्थानी असलेल्या सिरिलने मलेशियाच्या डेरेन लियूला १७-२१, २१-१९, २१-१२ असे हरवले होते. मात्र, उपांत्यपूर्व फेरीअगोदरच्या सामन्यात त्याला चीनच्या लेइ लान शीने हरवले. दुसरीकडे, तिसऱ्या सीडेड शुभांकरला मलेशियाच्या जिया वेई टेनने ११-२१, १७-२१ असे हरवले.

ABOUT THE AUTHOR

...view details