लखनौ -भारताचा स्टार बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची शनिवारी अंतिम फेरी गाठली आहे. तर, महिलांमध्ये भारताची महिला बॅडमिंटनपटू रितूपर्णा दासचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.
सय्यद मोदी चॅम्पियनशिप : सौरभ वर्मा अंतिम फेरीत - सय्यद मोदी लेटेस्ट न्यूज
२६ वर्षीय सौरभने उपांत्य फेरीत कोरियाच्या हीओ क्वांग ही याचा २१-१७, १६-२१, २१-१८ असा पराभव केला. अंतिम फेरीत त्याचा सामना चायनीज तैपेईच्या वांग झू वेईशी होणार आहे. वांगने कोरियाच्या सन वॉनहूला हरवत अंतिम फेरी गाठली.
सय्यद मोदी चॅम्पियनशिप : सौरभ वर्मा अंतिम फेरीत
हेही वाचा -डेव्हिस चषक : भारताकडून पाकची धुलाई, आता आव्हान क्रोएशियाचे
२६ वर्षीय सौरभने उपांत्य फेरीत कोरियाच्या हीओ क्वांग ही याचा २१-१७, १६-२१, २१-१८ असा पराभव केला. अंतिम फेरीत त्याचा सामना चायनीज तैपेईच्या वांग झू वेईशी होणार आहे. वांगने कोरियाच्या सन वॉनहूला हरवत अंतिम फेरी गाठली. महिलांमध्ये थायलंडच्या फिट्टायापोर्न चायवानने रितूपर्णा दासचे आव्हान संपुष्टात आणले. चायवानने दासचा २४-२२, २१-१५ असा पराभव केला.