बासेल - भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने स्वीस ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. तिने उपांत्य फेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डट हिचा सरळ गेममध्ये पराभव केला.
विश्वविजेती आणि ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणारी सिंधूने डेन्मार्कच्या मियाचा २२-२०, २१-१० अशा पराभव केला. सिंधूने ४३ व्या मिनिटात मियाचा धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली.
सिंधू-मिया यांच्यातील हा पाचवा सामना होता. यातील चार सामने सिंधूने जिंकले आहेत. तर एका सामन्यात मियाने विजय मिळवला आहे.