फुल्टन - भारताचा बॅडमिंटनपटू सौरभ वर्माने भारताच्याच एचएस प्रणॉयला हरवत यूएस ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. अवघ्या 50 मिनिटांमध्ये सौरभने प्रणॉयला हरवत हा सामना खिशात घातला.
US ओपन : सौरभ वर्माची सेमीफायनलमध्ये धडक, प्रणॉयवर मात - semi final
शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या क्वार्टर फायनलमध्ये सौरभने प्रणॉयवर 21-19, 23-21 अशी मात केली.
US ओपन : सौरभ वर्माची सेमीफायनलमध्ये धडक, प्रणॉयवर मात
शुक्रवारी खेळल्या गेलेल्या या क्वार्टर फायनलमध्ये सौरभने प्रणॉयवर 21-19, 23-21 अशी मात केली. या विजयाबरोबरच सौरभने प्रणॉयविरुद्ध 4-0 असे समीकरण केले आहे. 2017 च्या इंडियन ओपनमध्ये सौरभने एचएस प्रणॉयला हरवले होते.
या स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये थाईलंडच्या तानोंगसाक सीनसोमबूनसुकशी सौरभची लढत होणार आहे.