पॅरिस -जगज्जेती पी. व्ही. सिंधू आणि भारताची दुसरी अव्वल खेळाडू सायना नेहवालचे फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असले तरी, सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्या जोडीने मात्र या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.
हेही वाचा -'कोहलीसारखं बनायचंय मला', पाकिस्तानच्या कर्णधाराची इच्छा
शनिवारी रात्री पुरुष दुहेरीच्या रोमांचक उपांत्य सामन्यात रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी पाचव्या मानांकित जपानच्या हिरोयुकी इंडो व युटा वतानाबेचा २१-११, २५-२३ असा पराभव केला. हा सामना ५० मिनीटांपर्यंत रंगला होता. या अगोदरच्या सामन्यात त्यांनी डेन्मार्कच्या किम एस्टररुप आणि अँडर्स स्कर्प यांना २१-१२, २२-२० अशी मात दिली होती.
सिंधू आणि सायनाने फ्रेंच ओपन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. यामुळे भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, दोघींचाही उपांत्य फेरीत पराभव झाला. सिंधूचा १६-२१, २६-२४, १७-२१ अशा फरकाने पराभव झाला. तर ४९ मिनिटे रंगलेल्या रोमांचक सामना यंगने २२-२०, २३-२१ अशा फरकाने जिंकत सायनाचा पराभव केला.