सिंगापूर - भारताचे आघाडीचे बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधु, सायना नेहवाल, किदम्बी श्रीकांत आणि समीर वर्मा यांनी आपआपले सामने जिंकत गुरुवारी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला.
सिंगापूर ओपन बॅडमिंटन : नेहवाल-सिंधू पाठोपाठ श्रीकांत, समीरही क्वार्टर फायनलमध्ये
पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतने दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या हेंस क्रिस्टियन सोल्बर्ग विटिंग्सचा केला पराभव
पुरुष एकेरीत किदंबी श्रीकांतने दुसऱ्या फेरीत डेन्मार्कच्या हेंस क्रिस्टियन सोल्बर्ग विटिंग्सला ३७ मिनीटे चाललेल्या सामन्यात 21-12, 23-21 ने पराभुत केले. तर दुसरा भारतीय खेळाडू समीर वर्माने चीनच्या लु गुआंग्झुला ४४ मिनिटांच्या सामन्यात 21-15, 21-18 असे नमवत क्वार्टर फायनल गाठली.
याच स्पर्धेत भारतीय खेळाडू पारुपल्ली कश्यपला मात्र दुसऱ्या फेरीत पराभवाला सामोरे जावे लागल्याने स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. कश्यपला चीनच्या चेन लोंगने 9-21, 21-15, 16-21, असे पराभूत करत स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला.